बेळगाव लाईव्ह :इयत्ता पाचवीच्या बोर्ड परीक्षेची काल मंगळवारी गणिताच्या पेपरने सांगता झाल्यानंतर आता उद्या गुरुवार दि. 28 मार्च रोजी आठवी व नववीच्या परीक्षेची सांगता होणार आहे. या तीनही परीक्षांचे पेपर अर्थात उत्तर पत्रिका विभाग पातळीवर तपासल्या जाणार आहेत.
शिक्षण खात्याने पाचवीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम उद्या 28 मार्चपर्यंत तसेच आठवी व नववीच्या उत्तर पत्रिका येत्या 2 एप्रिलपर्यंत तपासून निकाल तयार करावा अशी सूचना शाळांना केली आहे.
इयत्ता पाचवीची परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनी दिवसाला 80 उत्तर पत्रिका तपासाव्यात तसेच 31 मार्चपर्यंत सर्व काम पूर्ण करावे.
त्याचप्रमाणे आठवीच्या उत्तर पत्रिका तपासणाऱ्या मूल्यमापकांनी दिवसाला 60 तर नववीच्या दिवसाला 40 उत्तर पत्रिका तपासाव्यात आणि 2 एप्रिलपूर्वी निकाल तयार करावा, अशी सक्त सूचना शिक्षण खात्याने केली आहे.