बेळगाव लाईव्ह: गेल्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात चोरीला गेलेल्या कंटेनर मधील बडीशेप या उत्पादनाची सध्या बेळगाव बाजारपेठेत विक्री होत असल्याचे वृत्त असून चोरीला गेलेल्या बडीशेप उत्पादनाची राजरोस विक्री करण्याच्या या प्रकाराकडे पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की एक मोठ्या कंपनीच्या बडीशेप उत्पादनाची विक्री करणाऱ्या मुंबई येथील मुख्य वितरकाचा सुमारे 12 लाख रुपये किमतीचा बडीशेपनी भरलेला एक कंटेनर गेल्या सप्टेंबर महिन्यात चोरीला गेला होता.
मात्र आता पाच महिन्यानंतर चोरीला गेलेल्या त्या कंटेनर मधील त्या बडीशेप या उत्पादनाची विक्री बेळगाव बाजारपेठेत केली जात असल्याचे समोर आले आहे त्यामुळे याची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तसेच हा प्रकार बेळगावातील एका विवाहित जोडप्याकडून केला जात असल्याचे जागरूक व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. सदर प्रकाराबद्दल बेळगाव शहरातील बडीशेप या उत्पादनाच्या अधिकृत वितराकांकडे सातत्याने चौकशी करणारे फोन येत आहेत. रविवार पेठेतून या चोरीच्या बडीशेप उत्पादनाची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चोरीचा माल या पद्धतीने खुलेआम बेळगाव शहरात विकला जात असल्याचे कळताच बाजारपेठेत खळबळ उडाली असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.