बेळगाव लाईव्ह : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार असा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडून उल्लेख होत असलेल्या लक्ष्मणराव चिंगळे यांची बुडा (बेळगाव नगरविकास प्राधिकरण) अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. ते शनिवारी सकाळी सूत्रे स्वीकारणार आहेत.
धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव चिंगळे यांची निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर बुडा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीतून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले मागे पडले आहेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
धनगर समाजातील मोठे नेते असलेले लक्ष्मणराव चिंगळे यांच्या नावावर मुख्यमंत्री सिद्धरामय्याने बेळगाव बुडा अध्यक्ष पदासाठी सही केली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता चिंगळे हे बुडा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेस पक्षाकडून चिंगळे यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यांना त्यांची नियुक्ती अध्यक्षपदी झाल्याने त्यांचा त्यांचा पत्ता लोकसभा मतदान निवडणुकीतून कट झाल्याचे मानले जाते आहे.
बुडा अध्यक्ष पदासाठी माजी आमदार फिरोज सेठ, राजू शेठ, विनय नवलगट्टी, सुधीर गड्डे, अजीम पटवेगार, सुनील हनमन्नावर यांच्यासह अनेक जणांची नावे समोर येत होती. मात्र अखेर शासनाने चिंगळे यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर येत आहे.