Sunday, January 5, 2025

/

पाकिस्तान.. घोषणा प्रकरणी नूतन राज्यसभा सदस्यांना चौथा आरोपी करा:

 belgaum

बेळगाव लाईव्ह: पाकिस्तान जिंदाबाद घोषणा प्रकरणी भाजपने सतत आंदोलन केल्यामुळेच राज्य सरकारने तीन जणांना अटक केली आहे. मात्र अद्याप (FSL) फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजून का जाहीर केला नाही असा सवाल कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस विजयेंद्र यांनी केला आहे.

मंगळवारी सकाळी बेळगाव विमानतळावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बेळगाव दौऱ्यावर आहेत त्यासाठी लोकसभा निवडणुकी अगोदर विजयेंद्र देखील बेळगावात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून बैठक घेण्यासाठी आले असता ते बोलत होते.

खासगी एफएसएलचा अहवाल आला नसता तर अटक करणे कठीण झाले असते. सरकारने सरकारचा पीएसएल अहवाल का उघड केला नाही हे सांगावे. देशद्रोही कोण आहेत या घोषणाबाजीचा सूत्रधार कोण आहे ते देखील जाहीर व्यायला हवे अशी मागणी त्यांनी केली.

नूतन राज्यसभा सदस्य नासिर हुसेन यांचे नाव आरोपीच्या यादीतून का वगळण्यात आले आहे याचे स्पष्टीकरण हवे. हुसेन यांना क्रमांक 4 आरोपी करण्यात यावे आणि कायद्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशीही मागणी त्यांनी केली.

Vijayendra
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत नासिर हुसेन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घ्यायला देऊ नये यासाठी कर्नाटक भाजपकडून उपराष्ट्रपती यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद करत जोवर या संपूर्ण प्रकरणातून हुसैन निर्दोष होत नाहीत तोपर्यंत त्यांना शपथबद्ध करू नये असेही म्हटले आहे.

याप्रकरणी राज्य सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे एफ एस एल चा रिपोर्ट का जाहीर करायला तयार नाहीत? कुणीही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर घोषणा देणारे सगळे देशद्रोहीच त्यावेळी हिंदू मुस्लिम जाती धर्म समोर येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.