बेळगाव लाईव्ह :घरफोडी करून चोरट्यांनी घरातील सुमारे 6 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच मारीहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील गंगाधरनगर, शिंदोळ्ळी येथे उघडकीस आली आहे.
शिंदोळ्ळी गावातील गंगाधरनगर प्लॉट नं. 23 येथील 54 वर्षीय गंगाम्मा चंद्राप्पा निलप्पगोळ यांच्या घरात गेल्या सोमवारी सायंकाळी हा चोरीचा प्रकार घडला असून याप्रकरणी काल मंगळवारी गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी गेल्या सोमवारी सायंकाळी 4 ते रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान गंगाम्मा निलप्पगोळ यांच्या घराचा मागील दरवाजा फोडून आज प्रवेश केला.
त्यानंतर त्यांनी बेडरूम मधील लाकडी वॉर्डरोब कपाटाचे कुलूप तोडून कपाटा मधील 180 ग्रॅम वजनाचे आणि सुमारे 6,35000 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 20 ग्रॅम वजनाचा सुमारे 60,000 रुपये किमतीचा सोन्याचा चपल हार, 20 ग्रॅम वजनाची सुमारे 60,000 रुपये किमतीची सोन्याची चेन,
60,000 रुपये किमतीचा अन्य एक सोन्याचा दागिना, 40 ग्रॅम वजनाचे सुमारे 2,00,000 किमतीचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम वजनाचे सुमारे 60,000 रुपये किमतीचे एक सोन्याचे ब्रेसलेट आणि 60000 रुपये
किमतीच्या 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नेकलेसचा समावेश आहे. याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.