बेळगाव लाईव्ह: ग्रामीण भागातून जे विशेषतः लहान शहरातूनच खरी पत्रकारिता जोपासली जाते याशिवाय अत्यल्प सुविधा संरक्षणाचा अभाव अश्या खडतर स्थितीत शहरापेक्षा ग्रामीण भागात पत्रकारितेचा कस लागतो असे उद्गार टाइम्स नाऊ मराठी वृत्तवाहिनीचे संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे 22वे अधिवेशन पुणे चिंचवड येथील आहेर गार्डन येथे पार पडले. त्यानिमित्ताने आयोजित अमृत काळातील भरत आणि पत्रकारितेतील राम या विषयावरील परिसंवादात सहभागी झाल्यावर बोलत होते. ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, लोकमत डिजिटल चे संपादक आशिष जाधव, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी परिसरात सहभाग घेतला होता.
गोवा हेरॉल्ड चे संपादक दिनेश केळुसकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता , सकाळचे मुंबई ब्युरो चीफ विनोद राऊत यांना युद्ध वार्ता पत्रकारिता, बेळगाव लाईव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना एकलव्य राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यातील दीड हजार हून अधिक पत्रकारांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता. खासदार अमोल कोल्हे आमदार बच्चू कडू आमदार महेश लांडगे सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांच्या उपस्थितीत पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी बेळगोजी यांनी सीमाभागाची कैफियत मांडली. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी सरकारवर दबाव आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार होते पण आचारसंहिता आणि इतर राजकीय घडामोडीमुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. पण या दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पत्रकारांच्या पाठीशी थांबण्याचे आश्वासन दिले.या अधिवेशनात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, गोविंद वाकडे, नितीन शिंदे यांच्यासह सुमारे दीड हजार पत्रकार सहभागी झाले होते.