Sunday, December 22, 2024

/

रंगोत्सवाला उधाण टिमकी-डमरूचं.. परराज्यातून आगमन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जाणारा हिंदू धर्मातील शेवटचा सण म्हणजेच होळी! होळी, होलिका, हुताशनी, शिमगा अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

विविध प्रांतानुसार विविध पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणात टिमकी वाजविण्याची परंपरा काही भागात आहे. बेळगावमध्ये प्रत्येक सण आगळ्या – वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे होळी! होळीच्या निमित्ताने वाजविली जाणारी टिमकी आणि टिमकी बनविणारे कारागीर सध्या बेळगावमध्ये दाखल झाले आहेत.

होळी सण म्हटलं कि बोंबलणे आणि टिमकी वाजवणे पर्यायाने आलेच! ‘बुरा ना मनो होली है’ असं म्हणत रंगोत्सवाच्या आधीच एकदिवस जल्लोष साजऱ्या करणाऱ्या तरुणाईचे आणि बालचमूंचे जल्लोष करण्याचे साधन आणि ऐन होळीत होळी दहनासोबतच रंगांची उधळण करणाऱ्या या सणात टिमकीला विशेष महत्व आहे. अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या या सणासाठी बाजारपेठ रंगून निघाली आहेच तर परप्रांतातून टिमकी, डमरू बनविणारे कारागीर देखील दाखल झाले आहेत.

गेल्या १५ ते १६ वर्षांपासून होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहार मधून हे कारागीर बेळगावमध्ये दाखल होतात. टिमकीसह डमरू, ढोलकी, मृदंग, काँगो यासारखी अनेक वाद्ये विक्रीसाठी ते घेऊन येतात. लहान आकारातील प्लास्टिक, फायबर आणि चर्मवाद्ये बालचमूंपासून मोठ्यांना तसेच कलाकारांनाही उपयुक्त ठरतील, अशी वाद्ये या कारागिरांकडे उपलब्ध आहेत. १५० ते १०००, २००० विविध आकार, प्रकारानुसार हि वाद्ये उपलब्ध आहेत.Holi fest damaru

केवळ नव्याने बनविलेली वाद्येच नाही तर जुनी वाद्ये रिपेरीं करण्याचे कामदेखील या कारागिरांकडून सुरु आहे. प्रांतानुसार साजऱ्या होणाऱ्या सणाच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यासारख्या ठिकाणी फिरता व्यवसाय करणारे हे कारागीर सध्या बेळगावच्या होळीचा ‘सिझन कॅश’ करण्यासाठी दाखल झाले आहेत.

होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. यामुळे याकरिता लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या बेळगावमध्ये दाखल झालेल्या परप्रांतीय कारागिरांमधून सुरु आहे. तर होळी दहनाबरोबरच रंगाची उधळण करणारा हा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून या सणाच्या तयारीसाठी नागरिकांची देखील लगबग सुरू आहे. बेळगावमध्ये विविध ठिकाणी आगळी वेगळी साजरी केली जाणाऱ्या होळीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.