Wednesday, November 20, 2024

/

शहर उपनगरात दाट धुक्याची सुखद चादर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:शहरासह विशेष करून शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी शाहूनगर वगैरे उपनगरी भागांमध्ये आज पहाटे धुक्याची दाट चादर पसरल्याचे दिसून आले. दिवसभर उन्हामुळे उष्मा असताना काही दिवसापूर्वी तुरळात पावसाने हजेरी लावली होती, आता सकाळी धुकं पडू लागल्यामुळे एकंदर बेळगावचे हवामान संभ्रमित करणारे ठरत आहे.

बेळगाव शहर उपनगरामध्ये आज पहाटे भल्या सकाळी धुक्याची चादर पसरल्याचे पहावयास मिळाले. अलीकडे दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या धुक्यामुळे सकाळी गारव्याची अनुभूती मिळाली. व्हॅक्सिंग डेपो तसेच अन्य माळरानाच्या ठिकाणी हे धोके इतके गडद होते की कांही फुटानंतर पुढचे कांही दिसत नव्हते. रस्त्यावरील दाट धोक्यामुळे काही ठिकाणी वाहनचालकांना दिवे लावून वाहने चालवावी लागत होती. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी मात्र धुके पसरलेल्या वातावरणाचा सुखद अनुभव घेतला.

दरम्यान, अलीकडे बेळगांवचे वातावरण रंगीबेरंगी झालं आहे कुठं धुकं आहे, कुठं ऊन आणि कुठं तुरळक पाऊस आहे. या अशा वातारणामुळे एकंदर बेळगावकरांमध्ये हवामानाच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण दुपारी कडकडीत ऊन पडत असल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असे म्हणावे तर मध्येच पाऊस तुरळक हजेरी लावून जातो.

आता सकाळी मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या धुक्यामुळे नागरिक अचंबित झाले आहेत. हे असे वातावरण यापूर्वी कधी अनुभवले नसल्याचे त्यांच्यातून बोलले जात आहे. नव्हते. एकंदर हवामानाचा नवा ( मुड ) मनसुबा काय आहे हेच समजेनासे झाले आहे. दुसरीकडे सध्याच्या विचित्र वातावरण आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे.

कडक उन्हामुळे उष्मा प्रचंड वाढला असून भूजल पातळी खालावून बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी चारी दिशा फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तळाचे पाणी प्याल्याने अनेक नागरिकाची प्रकृती बिघडत आहे. एकंदर बेळगावातील सध्याचे वातावरण सर्वांना संभ्रमात टाकत आहे एवढे खरे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.