बेळगाव लाईव्ह : आयोध्या येथे नुकताच प्राणप्रतिष्ठापना झालेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराला दररोज लाखो लोक भेट देत आहेत बेळगावातील ही अनेकांनी या मंदिराला भेट दिली आहे. बेळगाव तालुक्यातील येळळूर गावातील युवक अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चक्क सायकलवरून प्रवासाला सुरुवात केली आहे.
विराट गल्ली येळ्ळूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, श्री राम सेना हिंदूस्थान संघटनेचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते शिवभक्त कु. किसन टक्केकर यांनी सायकल वरून बेळगाव ते अयोध्या हा प्रवास सुरू केला आहे.
रविवारी सकाळी 6 वा. येळ्ळूर ते श्री राम जन्मभूमी अयोध्या सायकल यात्रा सुरू करताना प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
सकाळी किसन याने सर्व प्रथम ग्राम देवता चांगळेश्वरी देवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आपल्या प्रवासाला सुरवात केली.
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी किसन टक्केकर यांच्या बरोबर स्वतः सायकल वरून येळ्ळूर पासून ते एस सी मोटर पर्यंत प्रवास करून त्यांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ड्राय फ्रुट व अर्थ साहाय्य केले.
यावेळी वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगाव चे सदस्य उपस्थित होते, यांनी किसन यांना शुभेच्छा दिल्या.