Friday, May 24, 2024

/

अमित जडे यांचा लुधियानात होणार सन्मान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पंजाब मधील लुधियाना येथे होणाऱ्या १५व्या मिस्टर इंडिया २०२४ या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धे करीता बेळगावचे बॉडी बिल्डिंग कोच डॉ. अमित जडे यांना निमंत्रण मिळाले आहे.

डॉ. अमित जडे यांनी बॉडी बिल्डिंग या विषयात पी एच डी पदवी मिळवली आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये पी एच डी मिळवणारे जडे एकमेव व्यक्तिमत्व होय यासाठी त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या व्यासपीठावर त्यांचा गौरव होणार आहे.

डॉ. अमित जडे यांचा सत्कार राष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न व कारणीभूत ठरले आहेत त्यात महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश आहे.

 belgaum

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि सौ. शर्मिला ताई ठाकरे व त्यांचे सहकाAmit jadeरी वकील राजेंद्र शिरोडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ( मनसे ), डॉ.ऋषी शेरेकर , अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना महाराष्ट्र राज्य, अमृत मोहनराज जावळे,उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना, महाराष्ट्र राज्य, मनसे सचिव डॉ. सचिन मोरे, तसेच बेळगांव महानगर पालिकेचे नगरसेवक रवी साळुंखे या सर्वांच्या प्रयत्नाने डॉ. अमित जडे यांचा सत्कार पंजाब लुधियाना मध्ये होत आहे.

डॉ. अमित जडे यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगांवचे नाव उज्वल केले आहे. डॉ. अमित जडे यांना बेळगांवचे भुषण, एकलव्य अवॉर्ड पुरस्कृत, मिस्टर इंडिया विजेते सुनिल आपटेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.