Saturday, November 9, 2024

/

मंगळवारपर्यंत ‘या’ भागातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉनकडून आज रविवारी तातडीचे नियतकालिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे बेळगाव उत्तर विभागातील कांही भागात आजपासून मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे.

विद्युत दुरुस्तीमुळे टीबी वॉर्ड पंप हाऊस इथून बेळगाव उत्तर विभागातील डेमो झोनमध्ये केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येईल. सदाशिवनगर, अयोध्यानगर, नेहरूनगर, अझमनगर, शाहूनगर, शिवबसवनगर, वैभवनगर,

सत्यसाई कॉलनी परिसरात आजपासून मंगळवारपर्यंत पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एल अँड टी ने केले आहे.

महिला पतंजली योग समितीतर्फे 108 कुंडीय यज्ञ भक्तीभावात

महिला पतंजली योग समितीतर्फे रथसप्तमीचे औचित्य साधून समृद्धी कॉलनी, वडगाव येथील उद्यानामध्ये आयोजित 108 कुंडीय यज्ञाचा कार्यक्रम विधी मोठ्या भक्तीभावाने पार पडला.

सदर कार्यक्रमास पतंजलीच्या उत्तर कर्नाटक राज्य प्रभारी आरती कानगो व बेळगाव जिल्हा प्रभारी शोभा नौकुडकर उपस्थित होत्या. प्रारंभी आरती कानगो यांनी योग आणि प्राणायाम सोबत यज्ञाचे महत्व विशद केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यातील योग साधकांनी एकत्रितपणे पवित्र मंत्रोच्चारात 108 यज्ञ केले. पवित्र मंत्रोच्चार आणि यज्ञ यामुळे उद्यान परिसरातील वातावरण भारावून गेले होते. यावेळी हरिद्वार येथून पतंजलीचे आचार्य यज्ञदेवजी यांचे लाईव्ह संबोधन झाले. विविध प्रकारचे यज्ञ आणि वेगवेगळ्या आजारात त्या आजारांची आयुर्वेदिक औषधी सामग्री वापरून विशिष्ट प्रकारे यज्ञ केल्याने होणारे फायदे आचार्यांनी सांगितले. कार्यक्रमास संगीता जोशी, अमरेंद्र कानगो आदींसह समृद्धी कॉलनी व शहरातील योगसाधक बहुसंख्येने उपस्थित होते अखेर प्रसाद आणि महिलांना हळदीकुंकू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.