बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या ज्येष्ठ पत्रकार सुनीता देसाई यांची कन्या वचना देसाई हिने कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळविल्याबद्दल आज इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ब्लॅक बेल्ट मिळवणाऱ्या वचना देसाई हिची कीर्ती जगभर पसरावी अशी भावना व्यक्त करत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास कन्नड संस्कृती विभागाच्या विद्यावती भजंत्री, पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी, काँग्रेसचे युवा नेते आनंदा बकुडा यांच्यासह विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परदेशी क्रीडाप्रकार असलेली कराटे हि कला आज जगभरात आत्मसात केली जात आहे. एकाग्रता आणि शिस्त शिकविणाऱ्या या कलेत आज बेळगावमध्येही अनेक क्रीडापटू चमकत आहेत, हि चांगली गोष्ट असल्याचे विद्यावती भजंत्री म्हणाल्या.
यावेळी बेळगाव जिल्हा कराटे मुख्य परीक्षक गजेंद्र बी. काकतीकर, कन्नड संस्कृती विभागाच्या संचालिका विद्यावती भजंत्री, काँग्रेसचे युवा नेते आनंदा बकुडा, तसेच प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, सुनीता देसाई, रमेश देसाई, गीता देसाई आदी उपस्थित होते.