Saturday, July 27, 2024

/

डॉ. कागणीकरांच्या पाणलोट प्रकल्पाला आरएफओ प्रशिक्षणार्थींची भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर यांनी साकारलेला पाणलोट प्रकल्प पाहण्यासाठी मेघालय, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथून आरएफओ प्रशिक्षणार्थी वाल्मी संस्थेच्या अधिकाऱ्यांसह आले होते.

धारवाडच्या वाल्मी संस्थेमार्फत ५० जणांचा समूह बेळगाव तालुक्याच्या उत्तरेकडील बंबरगा, कट्टणभावी, निंगेनहट्टी आणि गोरमहट्टी परिसरात प्रकल्प पाहण्यासाठी बेळगावमध्ये आला होता.

डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहभागातून बंबरगा गावाच्या शेजारी बांधलेल्या छोट्या धरणामुळे आजूबाजूच्या परिसरात हिरवळ पसरली आहे. याच परिसरात असलेल्या डोंगराळ भागात पाणी पोचवण्यासाठी चाळ तोडण्यात आली असून झाडांची लागवडही करण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे या भागातील जमिनीत पाणी मुरून आसपास असलेल्या लहान धारण आणि विहिरींमध्ये बारमाही पाणीसाठा रहात आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.

डॉ. शिवाजी कागणीकर यांनी लोकसहभागातून केलेल्या पाणलोट प्रकल्पाच्या प्रयोगानंतर या भागातील परिस्थिती पालटली असून शेती, जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.Kaganikar

विशेष म्हणजे हा प्रकल्प कोणत्याही शासकीय मदतीशिवाय स्थानिक लोकांच्या सहकार्यातून साकारण्यात आला आहे. केवळ पाणीटंचाईवर मात करणे हे उद्दिष्ट्य न ठेवता या भागातील डोंगर उतारावर फळझाडांचीही लागवड करण्यात आली आहे. डोंगराळ भागात अशापद्धतीने साकारण्यात आलेला हा प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या आरएफओ प्रशिक्षणार्थींनी प्रकल्पाचे आणि प्रकल्प साकारण्यात आलेल्या सर्वांचे कौतुक केले.

यावेळी आरएफओ प्रशिक्षणार्थी, अधिकारी, वाल्मी संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षक फकीरेश आगडी, कार्यकर्ते राहुल पाटील, धारवाड वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

ही न्युज देखील वाचा

आदर्श ग्रामासाठी लढणारा “शिवाजी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.