Thursday, May 23, 2024

/

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी बेळगावात

 belgaum

बेळगाव लाईव्ह: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर कर्नाटकातील उत्तरा कन्नड, विजयपूर, बागलकोट, कोप्पल, रायचूर, कलबुर्गी, बिदर या सर्व जिल्ह्यांसाठी सुमारे 376 किलोमीटर लांबीच्या

आणि 6975 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग बांधणीच्या कामांना मंजुरी दिली असून सदर कामकाजाची पायाभरणी गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता नितीन गडकरी यांच्याहस्ते बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर करण्यात येणार आहे.

बेळगाव शहरात १६२२.०४ कोटी खर्चून ३४.४८ किमी लांबीचा ४/६ लेन (रिंगरोड) रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. 941.61 कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्ग 548B चिक्कोडी बायपास ते गोटूर पर्यंत

 belgaum

27.12 किमी लांबीच्या चौपदरी रस्त्याचे बांधकाम तसेच 887.32 कोटी खर्चून शिरगुप्पी ते अंकली पर्यंत 10 किमी रस्ता रुंदीकरण, 785.79 कोटी खर्चून मुरागुंडी ते चिक्कोडी जवळील 50.2 किमी लांबीच्या रस्ता

रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 4237.12 कोटी रुपये खर्चून 121.8 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. सदर कामांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.