Thursday, December 26, 2024

/

मनपाच्या विभागीय कार्यालयात चोरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरी घडल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे.

रविवारी दिवसभर सुट्टी असल्याने चोरट्यांनी डाव साधला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून महसूल विभागातील कागदपत्रांची चोरी झाल्यास प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, दक्षिण मतदार संघासाठी कार्यरत असणाऱ्या गोवावेस येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात सोमवारी (दि. १९) सकाळी भिंतीवरील खिडकीचे काचेचे दरवाजे तोडलेले निदर्शनात आले.

शनिवारी काम उरकून संपूर्ण कार्यालय बंद करून गेलेले कर्मचारी रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कार्यालयात पोहोचले यावेळी सदर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कागदपत्रांसह ४ लॅपटॉप्सची चोरी झाल्याचीही माहिती मिळाली आहे.Theft

शिवाय या कार्यालयात असणाऱ्या महसूल विभागात हि चोरी झाल्याचे डिसिन येत आहे. शिवाय तिजोरीचा दरवाजाही उघडलेला दिसून येत असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.

घटनास्थळी टिळकवाडी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करून नेमकं चोरी कोणी केली असावी चोरट्यांचा उद्देश काय असावा याचा तपास सुरू केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.