बेळगाव लाईव्ह :बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत त्यांना विजयी घोषित करण्यात आले सहाव्यांदा अध्यक्ष पद मिळवले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेळगाव वकील संघटना अर्थात बेळगाव बार असोसएशनची 2024 ते 26 या काळासाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने पार पडली.
बेळगाव बार असोसिशनच्या एकूण 11 जागांसाठी 37 जण रिंगणात होते दिवसभर मोठ्या चुरशीने वकिलांनी मतदान केले. बेळगाव बार असोसएशनच्या एकूण 2017 पैकी 1631 सदस्यांनी मतदान केले जवळपास 62% वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळीच्या सत्रात मतमोजणी सुरू झाली त्यावेळी मोठ्या संख्येने वकिलांनी गर्दी केली होती
शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत अध्यक्षपदी अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांना एकूण मते 1632 मते पडली त्यांनी 242 मतांच्या फरकाने बाजी मारली. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी अॅड. सुधीर जैन, अॅड. एस. एस. किवडसण्णावर आणि सुनील सानिकोप्प असे तिघेजण रिंगणात होते.
उपाध्यक्षपदी बसवराज मुगळी यांची निवड झाली असून त्यांना 899 मते मिळाली. अॅड. शितल रामशेट्टी आणि अॅड. विवेक व्ही. पाटील यांना 421 इतकी समसमान मते मिळाल्यामुळे दोघांनाही एका एका वर्षासाठी विभागून हे पद देण्यात आले आहे.
जनरल सेक्रेटरीपदी वाय.के.दिवटे यांनी बाजी मारली. त्यांना 462 इतकी मते मिळाली.
जॉइंट सेक्रेटरी म्हणून विश्वनाथ सुलतानपुरे निवडून आले असून त्यांना 544 मते मिळाली. तर
कमिटी सदस्य पदासाठी एकूण 13 जणांनी अर्ज केले होते. यापैकी सुमित अगजगी -873, ॲड इराप्पा पुजार-699, विनायक निंगनूर-680, सुरेश नागगनुरे-670 आणि अनिल पाटील-680 या पाच जणांनी विजयी मिळवला आहे. महिला प्रतिनिधी म्हणून 488 मते मिळवत अश्विनी हवालदार यांनी विजय संपादन केला.
बेळगाव पार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत पार पडली. मतदानप्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विजयी उमेदवारांना समर्थकांचा जल्लोष सुरु झाला होता.
अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणा-या ह्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. एकूण 11 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. जेएमएफसी न्यायालयातील वकील समुदाय भवन येथे पार पडलेल्या निवडणुकीनंतर सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतमोजणी हाती घेण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. आर. बी. मिरजकर यांनी काम पाहिले.