Sunday, December 22, 2024

/

हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्यांसाठी व्याख्यान

 belgaum

बेळगाव लाईव्ह: हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्या रुग्णासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटल तर्फे कार्डियाक रिहॅबिलिटेशन या विषयावर डॉ. प्रिया चोकलिंगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावात अशा तऱ्हेच्या व्याख्यानाचे पहिलेंदाच आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता सेंट्रा केअर हॉस्पिटल(दुसऱ्या रेल्वे गेट जवळ ,टिळकवाडी) येथे हे व्याख्यान होणार आहे.हे व्याख्यान मोफत असून त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

कार्डियाक रिहॅबिलिटेशन हे एक स्वतंत्र शास्त्र असून त्यात रुग्णासाठी टप्प्याटप्प्याने व्यायाम कसा करावा ,आहारात बदल कसा करावा याची बहुमोल माहिती दिली जाणार आहे.

Priya
हृदयरुग्णांना हे व्याख्यान उपयुक्त ठरणार आहे.व्याख्यान झाल्यावर रुग्णांच्या प्रश्नांना डॉ. प्रिया चोकलिंगम उत्तरे देणार आहेत.डॉ. प्रिया चोकलिंगम या चेन्नई येथील कार्डियाक वेलनेस इन्स्टिट्यूटच्या संस्थापक आणि क्लिनिकल डायरेक्टर आहेत.हृदय रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी,व्यायाम कोणते आणि कसे करावेत या बरोबर आणि आहार कोणता घ्यावा याविषयी व्याख्यानातून माहिती दिली जाणार आहे.

डॉ.सायली थाळी आणि ए.एच.ममता या देखील रुग्णांना व्यायाम आणि आहार याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.नाव नोंदणीसाठी ०८३१- ३५०८४८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.