Thursday, December 26, 2024

/

शॉर्ट सर्किटमुळे अंकली गावात अग्नितांडव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात असलेल्या बांबूच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानाशेजारील ७ – ८ घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे.

काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून अरुण मेदार यांच्या बांबूच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानाला आग लागून दुकान जळून खाक झाले.Burnt

आगीचा पेट पसरल्याने आजूबाजूच्या ७ ते ८ घरांना आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोवर दुकान पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

घटनेची माहिती समजताच डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचप्रमाणे भाकपचे विश्वनाथ चौगला, बी.एस. तलवार, पीएसआय केबी जक्कनवर यांनीहि भेट देऊन पाहणी केली. ही घटना अंकली पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.