बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रिहोट मोटर्स या कंपनीचे दूरदृष्टीकोन असणारे सीईओ अजित पाटील यांना ऑटोमोटिव्ह श्रेणीतील बिझनेस वर्ल्ड 40 अंडर 40 या देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात रिहोटचे सीईओ अजित पाटील यांना ऑटोमोटिव्ह श्रेणीतील बिझनेस वर्ल्ड 40 अंडर 40 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार गेल्या 12 वर्षात स्वतःच्या कंपनीची विशेष उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या युवा उद्योजकांची प्रशंसनीय ओळख करून देण्यासाठी प्रदान केला जातो.
अजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील रिहोट मोटर्स कंपनीने फक्त स्थानिक ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे चित्रच बदलले नसून नवकल्पना आणि उद्योजकतेची भावना याचे उदाहरण दिले आहे.
उपरोक्त प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अजित पाटील यांचे शहरातील औद्योगिक क्षेत्रात अभिनंदन होत आहे.