Sunday, July 21, 2024

/

उसवाहू ट्रॅक्टरची थांबलेल्या वाहनांना धडक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कित्तूर राणी चन्नम्मा चौकात असलेल्या सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना पाठीमागून येणाऱ्या उसवाहू ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाहनांचे मोठे झाले.

सोमवारी दुपारी २.०० च्या सुमारास हि घटना घडली असून दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी अशा तीन वाहनांना दिलेल्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले आहे. या वाहनांमध्ये नव्या कारचा समावेश होता.

सदर चारचाकी रविवारी दुपारीच नव्याने खरेदी केली होती. या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाहनधारकाचा पारा चढला.Accident

यावेळी ट्रॅक्टरचालक आणि कारचालकांमध्ये वादावादी घडल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रहदारी पोलिसांनी हस्तक्षेप करत समस्येवर तोडगा काढला.

या घटनेत नुकसान झालेली सर्व वाहने आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आले. या घटनेतील दोषी असणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित रहदारी पोलिसांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.