बेळगाव लाईव्ह:यंदाची 2023 -24 सालची पदवी पूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा येत्या 1 ते 22 मार्च या कालावधीत, तर एसएसएलसी परीक्षा 25 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली आहे.
बेंगलोर येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. शिक्षण मंत्री बंगारप्पा म्हणाले की, यंदा 8 लाख 96 हजार 271 मुले एसएसएलसी परीक्षा देणार असून राज्यात 2741 परीक्षा केंद्र आहेत.
त्याचप्रमाणे 6 लाख 98 हजार 624 मुले यावेळी पदवी पूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा देणार आहेत. उत्तीर्णतेसाठी तीन परीक्षांमधील सर्वाधिक गुण गृहीत धरले जातील.
तथापि तीनही परीक्षा देणे अनिवार्य नाही. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले असतील तेच गुण गृहीत धरले जातील.