*महामेळाव्याच्या पुढील न्यायालयीन तारखेला सर्व समिती कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन*
बेळगाव लाईव्ह :२०२२ ला झालेल्या महामेळाव्यादिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार म ए समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर केसीस दाखल केल्या होत्या.
जेएमएफसी ४ कोर्टात ,केस क्र. : १४६/२०२२ नुसार सुरू असलेल्या सुनावणीमध्ये दीपक अर्जुनराव दळवी, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश आप्पाजी मरगाळे,मदन बाबुराव बामणे, मनोहर कल्लाप्पा किणेकर, मालोजीराव शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, रणजीत बापूसाहेब चव्हाण,
प्रकाश रामचंद्र शिरोळकर, सचिन शांताराम केळवेकर, सुनील महादेव बोकाडे, सरिता विराज पाटील, रेणू सुहास किल्लेकर, श्रीकांत बाळकृष्ण कदम, दिलीप ज्योतिबा बैलूरकर, बापू वैजू भडागे, राजू म्हात्रू चौगुले, बाबू मारुती कोले, राकेश रमेश पलंगे, शिवाजी केदारी सुंठकर,
अनिल गुरुनाथ आंबरोळे, पियुष नंदकुमार हावळ, सूरज संभाजी कुडूचकर,दत्तात्रय अप्पय्या उघाडे,मनोहर लक्ष्मण हालगेकर,मनोहर आप्पाजी हुंदरे, सूरज नंदू कणबरकर, संतोष रमेश मंडलिक,धनंजय राजाराम पाटील यांचा समावेश आहे.
आज दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी या केसची तारीख असताना अनेकजण गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी पुढील तारखेला सर्वजण हजर राहण्याबाबत सूचना केली असून गैरहजर राहणाऱ्यांना वॉरंट जारी होणार आहे.
व सर्वजण हजर राहिल्यास दाव्याला सुरुवात होणार असून सर्वांनी पुढील तारीख ०२/०३/२०२४ रोजी प्रत्येकाने जातिनिशी हजर रहावे असे आवाहन ऍड महेश बिर्जे यांनी केले आहे.