बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुक्यात 11 गावात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज वसला असून तो संघटीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी खानापूर तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचा विस्तार होणे गरजेचे असून सभासद संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक घरात मंडळाची माहिती पोहचवणे गरजचे आहे.
तरच समाज संघटीत होईल. त्यासाठी प्रत्येक गावात वार्षीक सभासद संख्या वाढवण्याचा एकमुखी निर्णय रविवार दि.4 रोजी शिवस्मारक येथे खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ संचालकाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार होते. प्रारंभी प्रास्ताविक सचीव परशराम पालकर यांनी करत बैठकीचा उद्देश स्पष्ठ केला.
बैठकीत संघटना बळकट करण्यासाठी नवीन सभासद जोडणे. मागील सभेच्या इतिवृत्तीस मंजुरी. अहवाल अंदाज पत्रक 2016 ते 2023 सालच्या जमा खर्चास मंजुरी. खर्चाचा अहवाल छापील स्वरुपात सभासदापर्यंत पोहचवणे. ऑडिटर नेमणूक वार्षीक सभासद वर्गणी निश्चित. यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार, खजिनदार नागाप्पा उत्तुरकर, सदस्य यशवंत पालकर, जोतिबा कुंभार, विलास कुंभार, विवेकानंद मुरगोड, मोहन कुंभार, प्रशांत कुंभार, दुल्हाजी कुंभार, अमृत कुंभार, के. एल. कुंभार, नारायण कुंभार, अमृत कुंभार, सातेरी कुंभार, महेश चंदगडकर उपस्थित होते.