Friday, May 3, 2024

/

खादरवाडीची ‘ती’ जमीन पूर्ववत नावावर करण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भूमाफियांना पोसण्यासाठी दादागिरी करून खादरवाडी येथील 42 एकर जमिनीचा जो व्यवहार करण्यात आला आहे. तो तात्काळ रद्द करून संबंधित जमीन येत्या 10 दिवसात पूर्ववत कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावावर केली जावी. अन्यथा येत्या 11 मार्च 2024 रोजी आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

खादरवाडी तेथील समस्त शेतकरी संघटना गावकरी महिला मंडळ आणि श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या गावामध्ये नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत उपरोक्त मागणी करून इशारा देण्यात आला. सदर बैठकीत गावातील शेतकऱ्यांच्या 42 एकर जमिनीचा दादागिरी करून भूमाफियांना पोसण्यासाठी जो व्यवहार झाला त्याबद्दल चर्चा झाली.

जमिनीच्या व्यवहारांमध्ये कमिटी व वारसदाराने कब्जेदार शेतकऱ्यांच्या विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्यामुळे तसेच त्या जमिनीत पिण्याच्या पाण्याचा झरा असल्यामुळे गेल्या रविवारी ही बैठक वादावादीसह संतप्त वातावरणात पार पडली. बैठकीस खादरवाडीचे समस्त गावकरी, कब्जेदार शेतकरी, महिला, श्रीराम सेना हिंदुस्तानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

बैठकीमध्ये समस्त गावाच्यावतीने आम्हाला पैसे नको आमची जमीन परत मिळावी. कब्जेदार शेतकऱ्यांना फसवून जो 108 एकरचा व्यवहार वारसदार आणि वारी कमिटीने केला आहे तो रद्द करून 10 दिवसात ही जमीन खादरवाडी रयतेच्या नावाने केली जावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.Khadarwadi

कारण त्या जमिनीमध्ये खादरवाडी रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणारा बक्काप्पा देवाचा पाण्याचा झरा आहे. खादरवाडीवासीय गेली 100 वर्षे या झऱ्याचे पाणी पित आहेत. त्यामुळे जर ही जमीन पूर्वत कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावाने झाली नाही तर समस्त गावकरी, शेतकरी संघटना, श्रीराम सेना हिंदुस्तान खादरवाडी व समस्त महिला मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी याची नोंद घेऊन संबंधित जमीन त्वरित खादरवाडी रयतेच्या नावाने करावी, असा ठराव समस्त गावकऱ्यांच्यावतीने बैठकीत संमत करण्यात आला. भूमाफियांनी संपूर्ण जमिनीतील चाऱ्याला आग लावून जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे? याचीही जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.