बेळगाव लाईव्ह : परिवहन विभागाने वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी १७ फेब्रुवारीची अंतिम मुदत दिली आहे. निर्धारित वेळेत नंबर प्लेट न लावल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
ठराविक तारखेच्या कालावधीत एचएसआरपी नंबर प्लेट्स लावल्या नाहीत, तर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांवर (जुनी/अस्तित्वात असलेली वाहने) दुचाकी आणि तीन चाकी, हलकी मोटार वाहने, प्रवासी कार, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, ट्रेलर, ट्रॅक्टर इ. साठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवणे अनिवार्य आहे.
कर्नाटक राज्यात १ एप्रिल २०१९ पेक्षा जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट-HSRP मिळविण्यासाठी परिवहन विभागाने दिलेली मुदत १७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
अनेक वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्यात रस नाही. या पार्श्वभूमीवर आळा घालण्यासाठी विभाग पुढे आला असून प्रथमच एचएसआरपी न लावता वाहने पकडल्यास १००० रुपये दंड, दुसऱ्यांदा पकडल्यास २००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.