बेळगाव लाईव्ह:कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केइआरसी) कर्नाटकामध्ये विजेचा दरमहा 100 युनिटपेक्षा जास्त वापर असलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज दरातील या कपातीमुळे ग्राहकांना वीज बिल कमी येण्याचा फायदा होणार आहे.
वीज दरात कपात केली असली तरी कमी दरांमुळे उपयुक्तता (युटिलिटी) कंपन्यांना मिळणारा कमी महसूल भरून काढण्यासाठी सरकारला अनुदानासाठी अधिक निधीची तरतूद करावी लागणार आहे. युटिलिटी कंपन्या त्यांच्या खर्चाची पूर्तता करू शकतील आणि कमी दरामधून कमी महसूल असूनही आपले कार्य सुरू ठेवू शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी ही सबसिडी वाढ करणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 साठी विद्युत दराची सुधारणा : कर्नाटक विद्युत नियामक आयोगाने (केईआरसी) सर्व वितरण परवानाधारकांसाठी आर्थिक वर्ष 2024-25 साठी किरकोळ पुरवठा दरात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. दर आदेशातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. एफवाय 2024-25 साठी मिळालेला किरकोळ अधिशेष वेगवेगळ्या दर श्रेणींमध्ये दरांच्या फेरबदलासाठी वापरला गेला आहे.
व्यावसायिक, औद्योगिक ग्राहक आणि घरगुती ग्राहक (दरमहा 100 युनिट्सपेक्षा जास्त वापरणारे) शुल्कात लक्षणीय घट : एलटी घरगुती प्रकाशयोजना -100 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट 110 पैशांनी ऊर्जा शुल्क कमी. एचटी व्यावसायिक -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 125 पैशांनी कमी; मागणी शुल्क प्रति केव्हीए 10 रुपयांनी कमी कमी. एचटी औद्योगिक -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 50 पैशांनी कमी; मागणी शुल्क प्रति केव्हीए 10 रुपयांनी कमी. एचटी हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 40 पैशांनी कमी; मागणी शुल्क प्रति केव्हीए 10 रुपयांनी कमी केले.
एचटी खाजगी उपसा जलसिंचन -उर्जा शुल्क प्रति युनिट 200 पैशांनी कमी. एचटी निवासी संकुल (अपार्टमेंट) -मागणी शुल्क प्रति केव्हीए 10 रुपयांनी कमी केले. एलटी प्रा. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 50 पैशांनी कमी;
एलटी औद्योगिक प्रतिष्ठान -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 100 पैशांनी कमी. एलटी व्यावसायिक प्रतिष्ठान -ऊर्जा शुल्क प्रति युनिट 50 पैशांनी कमी.