बेळगाव लाईव्ह :तळागाळातील शासन सुधारण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने बेळगावातील ग्रामपंचायत सदस्यांमधील कार्यात्मक साक्षरता वाढीसाठी जो पुढाकार घेतला आहे त्याला गती प्राप्त झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 681 अ-साक्षर ग्रामपंचायत सदस्यांसह बेळगाव राज्यात कोप्पळ नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने (आरडीपीआर) 2022 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार 2021 मध्ये 6028 ग्रामपंचायत मधून निवडून आलेल्या 94 हजार ग्रामपंचायत सदस्यांपैकी 10 टक्के (9,550) सदस्यांना लिहिण्या -वाचण्याचे साधे प्राथमिक ज्ञान देखील नाही. याबाबतीत राज्यात कोप्पळ जिल्हा सर्वात आघाडीवर असून येथील 695 ग्रामपंचायत सदस्य अशिक्षित आहेत.
कोप्पळ मागोमाग बेळगाव (681), यादगिरी (670), रायचूर (650) आणि कलबुर्गी (640) यांचा क्रमांक लागतो. याउलट कोडगु जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 28 ग्रामपंचायत सदस्य अ-साक्षर आहेत. प्रारंभीच्या टप्पा जो 2022 मध्ये सुरू झाला.
त्यावेळी साक्षरता सन्मान योजनेअंतर्गत एएनएसएसआयआरडीने 10 जिल्ह्यातील 4078 ग्रामपंचायत सदस्यांची निवड केली होती. याचा मूळ उद्देश ग्रामपंचायत सदस्यांची प्राथमिक कन्नड साक्षरता आणि संख्या कौशल्य वाढविणे यावर लक्ष केंद्रित करून त्या सदस्यांना सुमारे 50 दिवस 100 तासांचे शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देणे, हा होता.