Sunday, November 24, 2024

/

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज दुपारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत आपल्या बेळगाव भेटीत ते रिंग रोडसह विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. बेळगाव भेटी प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहरातील व्यापारी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने निगडित रस्त्यांकडेही ते लक्ष देतील का? असा प्रश्न व्यापारी बंधूंकडून उपस्थित केला जात आहे.

बेळगाव शहराला लागून असलेला बेळगाव तालुका तसेच चंदगड आजरा व कोल्हापूर हा कृषीप्रधान प्रदेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध कृषी उत्पादने घेतली जातात. या उत्पादनांना चांगला दर मिळण्यासाठी गोव्यातील मोपा(मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट) आंतरराष्ट्रीय विमानतळ बेळगावपासून अवघ्या 90 किमी अंतरावर आहे. मात्र जांबेर डॅमपासून जर नवा रस्ता निर्माण केल्यास हे विमानतळ बेळगावसाठी आणखी जवळ पडणार असून कार्गो विमान वाहतुकीच्या माध्यमातून बेळगाव व चंदगड परिसरातील कृषी उत्पादन देश-विदेशात पोहोचू शकते. मात्र यासाठी चंदगड तालुक्यातील जांबेर डॅम ते गोव्याच्या मोपा विमानतळापर्यंतचा रस्ता होणे आवश्यक आहे.

असे झाल्यास सदर रस्ता बेळगाव चंदगडसह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज वगैरे तालुक्यांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. तेंव्हा या पद्धतीचे रस्ते तयार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकरी आणि त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

दरम्यान, बेळगाव व गोवा यांचा व्यापार आयात निर्यात यांच्या दृष्टीने जवळचा संबंध आहे. त्यामुळे बेळगाव होऊन गोव्याला जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करून चौपदरी महामार्ग तयार करावा, अशी मागणी बेळगावच्या नागरिकांतर्फे आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली जाणार आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी सध्या बेळगाव -गोवा व्हाया चंदगड अंबोली, बेळगाव -गोवा व्हाया जांबोटी, चोर्ला तसेच बेळगाव -गोवा व्हाया अनमोड असे तीन रस्ते उपलब्ध आहेत. चंदगड, आंबोली मार्गे बेळगाव -गोवा रस्ता हा कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यामधून गोव्याला जोडला जातो.

या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्याचाही विकास होणार आहे. तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाण्यासाठी हा रस्ता बेळगाव व कोल्हापूरच्या नागरिकांना सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे हा महामार्ग होणे गरजेचे आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी जांबोटी चोर्ला हा रस्ता सर्वात जवळचा ठरतो.Gadkari

या महामार्गाला गोव्यातील साखळी गावापर्यंत रुंदीकरणासाठी मंजुरी देण्यात आली असली तरी कामाला सुरुवात झालेली नाही. या रस्त्यामुळे गोव्यातील लोकांना व्यापारासाठी बेळगाव येणे सोयीचे ठरणार असून जांबोटी, कणकुंबी, चोर्ला, साखळी या गावांचाही विकास होणार आहे. बेळगाव -गोवा व्हाया अनमोड या मार्गाचे विकासकाम वनविभागाच्या आक्षेपामुळे मागील कांही वर्षांपासून रखडले आहे.

बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्यापुढील काम ठप्प झाले आहे. या महामार्गाचा विकास झाल्यास बेळगाव, खानापूर तसेच धारवाड जिल्ह्याच्याही विकासाला मदत मिळणार असल्यामुळे सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची जोरदार होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.