बेळगाव लाईव्ह:चव्हाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेज चेंबर ब्लॉक होऊन दूषित पाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याच्या तक्रारीचे तातडीने 12 तासात निवारण केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांची प्रशंसा होत असून नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, चव्हाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात गेल्या दीड महिन्यापासून ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन त्याचे दूषित पाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये मिसळत होत.
तेंव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शाहपूरकर व महिलावर्गाने मंगळवारी सायंकाळी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची दखल घेत बुधवारी सकाळी सुनील जाधव यांनी पुढाकार घेऊन सदर समस्या अवघ्या 12 तासाच्या आत दूर केली.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दिड महिन्यापासून या परिसरात दुर्गंधी व ड्रेनजचे पाण्यात मिसळत होते. परिणामी पिण्याचे पाणी दूषित होत असल्यामुळे नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्य धोका निर्माण झाला होता. परिसरातील ड्रेनेजच्या नादुरुस्त चेंबरमुळे सदर प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच सुनील जाधव यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने तसेच स्वतः जातीने पाठपुरावा करून अवघ्या 12 तासाच्या आत नळाच्या ड्रेनेज मिश्रीत दूषित पाण्याची समस्या निकालात काढली.
याबद्दल परिसरातील महिलावर्गाने बेळगाव लाईव्हशी बोलताना निर्माण झालेली समस्या आणि ती समस्या आपल्या तक्रारीची दखल घेऊन समाजसेवक सुनील जाधव यांनी कशी तत्परतेने निकालात काढली याची माहिती देऊन समाधान व्यक्त केले. तसेच सुनील जाधव यांचे आभार मानले.