Tuesday, July 2, 2024

/

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चार बालक अन्य एक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील मन्नत कॉलनी( महंतेश नगर ब्रीज जवळ) गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हायवे जवळील महंतेश नगर ब्रीज परिसरात कुत्र्याने चावा घेतला आहे.

पाच जखमी पैकी एकाची माहिती मिळाली असून त्याचे नाव अहीन आसिफ कलमनी वय 6 रा. मन्नत कॉलनी असे आहे .

 belgaum

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आपल्या घराजवळून ट्युशन पासून घराकडे जात असते वेळी अचानक भटक्या कुत्र्याने हल्ला करत अहिनला जखमी केले कुत्र्याने त्याच्या हाताला आणि पाठीवर हल्ला करत जखमी केले आहे.Dogs

उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्याच्या आल्यात जखमी झालेल्या अन्य चार जणांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून बेळगाव महापालिकेने यावर उपाय करून त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.