बेळगाव लाईव्ह:क्रिकेटमध्ये आपण एक लाख, दोन लाख, तीन लाख, पाच लाख दहा लाखाचे बक्षीसं बघितलेली आहेत.
मात्र पिता-पुत्र आमदारांनी चक्क 51 लाख रुपयांचे पहिले बक्षीस ठेवले आहे. ते कुठल्या क्रिकेट किंवा दुसऱ्या स्पर्धेसाठी नाही तर बेळगाव जिल्ह्यातील सदलगा येथील बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीसाठी ठेवले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विद्यमान विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा ओढण्याची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यास तब्बल 51 लाख रुपयांचे बक्षीस देऊन आमदार गणेश हुक्केरी नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. सदर शर्यत येत्या 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता चिक्कोडी येथील एकसंबा गावच्या मैदानावर आयोजित केली जाणार आहे.
मागील महिन्यात जुलै यांच्याकडून 25 लाख किमतीची शर्यत ठेवण्यात आली होती आता हुक्केरी यांनी 50 लाखांची शर्यत ठेवली आहे.