बेळगाव लाईव्ह :आपल्या मित्राची योग्यरीत्या सुश्रुषा केलेल्या डॉक्टरांचा सत्कार आणि त्याच निमित्ताने रक्तदान अशा पद्धतीचा उपक्रम बेळगावातील काही युवक आणि यंग बेलगाम फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला.
के एल ई च्या निरो सर्जरी विभागाचे डॉक्टर अभिषेक पाटील यांचा विशेष सत्कार या निमित्ताने करण्यात आला. वीस वर्षीय अद्वैत संजय चव्हाण पाटील याच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंग बेलगाम फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आपला मित्र वाचला या निमित्ताने वीस जणांनी या ठिकाणी रक्तदान केले. जीवन वाचवण्यासाठी समाजाचे योगदान दाखवण्याचा प्रयत्न यावेळी या तरुणांनी केला. यावेळी डॉ विठ्ठल माने, माजी महापौर विजय मोरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मित्राचा जीव वाचावा अशी या युवकांची इच्छा होती. त्यासाठी के एल ई च्या न्युरो सर्जरी विभागात त्याला दाखल करण्यात आले होते.
दरम्यान डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याला वाचवले याचे ऋण रक्तदान करून आणि डॉक्टरांचा सत्कार करून फेडण्यात आले आहे.