Friday, January 31, 2025

/

बेळगाव-पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मंजुरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते बेळगाव दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेस सेवेला मंजुरी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून हि सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती इराण्णा कडाडी यांनी ट्विट करून कळवली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नोकरी – व्यवसायानिमित्त पुण्याला नेहमी ये-जा करतात. या सर्वांसाठी इंटरसिटी रेल्वे सोयीची असल्याने बेळगाव-पुणे दरम्यान दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. बेळगावचे दिवंगत खासदार व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगाव – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस मंजूर केली होती.

त्यानंतर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी पुणे ते बेळगाव दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुविधा सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. पायाभूत सुविधांमध्ये महत्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस विद्युतीकरण झाल्यानंतर सुरु करण्यात येणार असून सूत्रांच्या मतानुसार येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 belgaum

बेळगाव ते पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवेची दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे. या शहरांना जोडण्यासाठी रेल्वेसेवा नसल्याने रहिवासी, पर्यटक आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय व्हायची.

मात्र आता वंदे भारत एक्स्प्रेस मार्गाला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांना सोयीचे जाणार आहे. शिवाय आर्थिक विकासाला चालना देखील मिळण्याची आशा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे याचसोबत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांचेही अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.