Thursday, November 28, 2024

/

इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेची सांगता

 belgaum

बेळगाव लाईव्ह -आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला 26 वा हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

काल व आज या दोन दिवसात एक लाखाहून अधिक आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी या उत्सवात सहभाग घेतला. शनिवारी रथयात्रा झाल्यानंतर मंदिराच्या पाठीमागील बाजूस उभारण्यात आलेल्या अनेक शामियाण्यात वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये प्रामुख्याने तरुण भक्तांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

आगामी विविध भाषात होणाऱ्या सात दिवसीय भगवद्गीता कोर्स मध्ये सहभागी होण्याचे आवाहन या वेळेला करण्यात आले.या रथयात्रेच्या निमित्ताने रविवारी दुपारी वैष्णव यज्ञ संपन्न झाला .या यज्ञात अनेक परिवारांनी भाग घेतला .या यज्ञांचे पुरोहित्य माधवचरण प्रभू व वृंदावन प्रभू यांनी केले .Iskcon bgm

रविवारी इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी सुरू केलेल्या या चळवळीचे लोण आता जगभरात कसे पोहोचले आहे, भगवंताची भक्ती का करावी ,आणि आपल्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबतचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्या प्रवचनात केले .याचबरोबर इस्कॉनच्या भक्तांनी सादर केलेल्या नाट्यलीला या उपस्थितांचे मनोरंजन करण्याबरोबरच मार्गदर्शनपर ठरल्या .

दोन दिवस बेळगाव शहर आणि परिसरात संपूर्ण वातावरण कृष्णमय बनले होते .संपूर्ण शहर कृष्णभक्तीत न्हाऊन निघाले होते. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे इस्कॉन तर्फे आभार मानण्यात आलेगोकुलानंद गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी श्री भरत चरितम् या विषयावर संस्कृत भाषेत प्रस्तुत केलेली नाट्यलिला विशेष आकर्षण होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.