Wednesday, October 9, 2024

/

बेळगाव केसरी’ साठी पै. सिकंदर, पै. गुरुजीत एकमेकांना भिडणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या बुधवारी दि. 6 मार्च 2024 रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले जाणार असून या मैदानात देशातील अव्वल पैलवानांसह इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधीर हणमंतराव बिर्जे यांनी दिली.

हिंदवाडी येथील आनंदवाडीच्या आखाड्यामध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदानातील ‘बेळगाव केसरी’ किताबाची कुस्ती युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. ही कुस्ती पै. सिकंदर शेख कोल्हापूर आणि पै. गुरुजीत मागरोड पंजाब यांच्यात खेळवली जाणार आहे.

‘बेळगाव मल्ल सम्राट केसरी’ किताबाची कुस्ती जयभारत फाउंडेशनने पुरस्कृत केला असून ती पै. माऊली कोकाटे पुणे आणि पै. महदी इराण यांच्यात होणार आहे. या खेरीज ‘दर्शन केसरी’ किताबाची कुस्ती श्रीकांत दादा देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. या किताबासाठी उप महाराष्ट्र केसरी पै प्रकाश बनकर विरुद्ध पै हादीझान इराण अशी लढत होणार आहे.Wrestling

तसेच कर्नाटकचा वाघ पै. कार्तिक काटे विरुद्ध काका पवार यांचा पठ्ठा पै. जयदीप पाटील यांच्यातील कुस्ती चुरशीची असणार आहे. दक्षिण भारतातील यु-ट्युबचा कुस्तीतील जादूगार पै. देवा थापा नेपाळ याची कुस्ती हे या मैदानाचे आणखी एक आकर्षण असणार आहे.

या खेरीज कुस्ती मैदानात इतर 70 काटाजोड लहान -मोठ्या कुस्त्यांचे आयोजन केले जाणार आहे, असे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.