Wednesday, January 8, 2025

/

शहरात दोन गटात दगडफेक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :समस्त शहरवासीय अयोध्येतील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या आनंदात दंग असताना जय श्रीराम घोषणाबाजी वरून दोन गटात जोरदार दगडफेक होऊन वातावरण कांही काळ तंग बनल्याची घटना काल सोमवारी रात्री शहरांमध्ये घडली. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काल सोमवारी रात्री बेळगावमध्ये जय श्रीराम असा जयजयकार करत निघालेल्या युवकांच्या एका गटावर अन्य एका गटाने दगड फेकले.

प्रत्युत्तर दाखल पहिल्या गटानेही दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार दगडफेक झाली. पाटील गल्ली येथे घडलेल्या या घटनेमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच घटना स्थळीचे वातावरण कांही काळ तंग बनले होते.

याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवण्याद्वारे परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

त्याचप्रमाणे पोलिसांनी रात्री श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करणाऱ्या परिसरातील नागरिकांनाही आपापल्या घरात जाण्यास सांगितले. फोर्ट रोड, दरबार गल्ली येथे देखील तुरळक दगडफेक झाल्याचे समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.