बेळगाव लाईव्ह: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई जिंकली असून सगे सोयरे सह आरक्षण दिले जाईल अश्या तिन्ही मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
बेळगावातील मराठा बांधवांच्या वतीने रविवारी 28 रोजी सकाळी 9:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.
बेळगावात सकल मराठा समाजाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केलं होते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला होता तत्पूर्वी छ्त्रपती संभाजी नगर मुक्कामी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व सकल मराठा समाजाच्या वतीने भेट घेऊन लढ्याला पाठिंबा दिला होता.
सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा,विविध मराठा आणि मराठी संघ संघटना संस्थांच्या नागरिकांच्या वतीने एकच कार्यक्रम करावा आणि एकाच ठिकाणी विजय उत्सव करावा असे आवाहन मराठा संयोजक गुणवंत पाटील, प्रकाश मरगाळे,शहर देवस्थान पंच कमिटी रणजित चव्हाण पाटील यांनी केले आहे.
सर्व मराठा संघटनांनी कुणीही दुसरा विजयोत्सव करू नये असे सर्व मराठा संघटनांनी सकाळी 9 वाजता छ्त्रपती शिवाजी उद्यानात एकत्रित यावे मिठाई वितरीत करून फटाक्यांची आतषबाजी करून मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षण निर्णयावर विजय उत्सव करावा असे आवाहन केले आहे.