बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह कर्नाटक महाराष्ट्र गोवा येथील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोहनगा दड्डी येथील भावेश्वरी देवीची यात्रा उद्या रविवारी 25 फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे .
हुक्केरी तालुक्यातील मौजे मोदगे(मोहनगे) येथील यंदाचा यात्रोत्सव मुहूर्त ठरला आहे.श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी मोदगे आणि श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे(मुंबई)यांचे कडून सर्व भाविकांना प्रती वर्षाप्रमाणे माघ पौर्णिमा नंतर यात्रेचा तारीख खालील प्रमाणे ठरवण्यात आली आहे.
प्रति वर्षा प्रमाणे माघ पौर्णिमे नंतर या देवीचा वार्षिक यात्रोत्सव आयोजित केला जातो मुंबई पुणे सह महाराष्ट्र आणि बेळगावातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला जात असतात नवसाला पावणारी देवी म्हणून भावेश्वरी देवी प्रसिद्ध आहे.भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार 25 फेब्रुवारी रोजी शस्त्र ईंगळ्या (सायंकाळी 6 ते दुपारी सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहतील) सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी भरयात्रा तर मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळा आणि यात्रा समाप्ती होणार आहे.
शस्त्र इंगळ्या रविवार सायंकाळी 6 वाजल्या पासून सोमवारी सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहतील त्यानंतर सहा नंतर बंद होतील याची भाविकांनी नोंद घ्यावी असे यात्रा कमिटीने कळवले आहे.
दरवर्षी बेळगाव कोल्हापूर भागातील मुंबई आणि महाराष्ट्रात स्थायिक झालेले हजारो भाविक या यात्रेत दाखल होत असतात बेळगाव शहर परिसर आणि तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने मोदगे जात असतात त्यामुळे या यात्रेकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री भावेश्र्वरी देवीची ख्याती आहे.
यात्रा काळात बेळगावातून वायव्य कर्नाटक परिवहन मंडळा कडून विशेष बसची सोय करण्यात आली आहे त्यामुळे भाविक बस आणि स्वतःच्या खाजगी गाड्या घेऊन देखील रवाना होतील.