बेळगाव लाईव्ह :संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मे हे बेळगाव परिसरात पहिले पाच हुतात्मे झाले आहेत. १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात ज्यांनी आपले सर्वोच्च बलिदान देऊन हुतात्मा पत्करलं त्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा पालकत्वाची जबाबदारी आज सीमावासियांनी घेतली पाहिजे.
या हुतात्मामुळे या सीमा लढ्याला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळेच गेली ६७ वर्ष हा सीमालढा तेवत ठेवला गेला आहे. केंद्र सरकारने आमच्यावर अन्याय केला असून आज भारतामध्ये भगवान रामाचे मंदिर उभारून रामराज्य करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सीमावासिय आजही न्यायासाठी वंचित राहिला आहे असे मत माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी व्यक्त केल्या.
१७ जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द हुतात्माना अभिवादन करण्यात आलेल्या नंतर आयोजित केलेल्या सभेवेळी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माझी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर होत्या.
त्या पुढे म्हणाल्या कीया प्रश्नासाठी लोकशाहीचे अनेक लढे लढले गेले आहेत,कोणताही लढा शिल्लक नाही असे सर्व लढे लढले असतानाही सीमावासियांना अजून न्याय मिळालेला नाहीखरंतर ही लोकशाहीची शोकांतिका आहे की काय असा प्रश्न आता सीमावासियांना पडला आहे.
जोपर्यंत सीमावासियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा सीमा लढा लोकशाहीच्या मार्गाने असाच ठेवला जाईल व सीमावासियाना लवकरच न्याय मिळेल तरच या हुतात्मांना खरी श्रद्धांजली ठरेल असे विचार माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केले.
कंग्रांळी येथील हुतात्मा बाळू निलजकर यांच्या समाधीला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आर एम चौगुले आर आय पाटील व यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा चौक येथील हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार मनोहर किनेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या ठिकाणी
मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला आर आय पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. तर बाळू निलजकर यांच्या प्रतिमेला माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर या सभेवेळी रामचंद्र मोदगेकर, माजी आमदार मनोहर किनेकर व अध्यक्ष भाषण रुक्मिणी निलजकर यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेजकर,शिवाजी सुंठकर, आर आय पाटील,बि डी मोहनगेकर,बी एस पाटील, प्रकाश शिरोळकर,आर के पाटील, सुधीर चव्हाण, गोपाळ पाटील, मनोहर संताजी, संतोष मंडलिक, सुरेश राजुकर,रावजी पाटील, दत्ता उघाडे, अनिल पाटील, सुनील अष्टेकर, निंगाप्पा मोरे, निंगाप्पा जाधव, नारायण सांगावकर, विनायक पाटील, शिवाजी पाटील, महादेव बिर्जे, व इतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात ज्यांनी हुतात्मा पत्करले ते कंग्राळी खुर्द चे मारुती बेन्नळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
कंग्राळी खुर्द च्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी बेन्नाळकर यांना साडी देऊन तर आरोग्य उपचारासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.