बेळगाव लाईव्ह : शाळेच्या दुरुस्ती कामासाठी छत काढल्याने खुल्या जागेत झाडाखाली बसून शाळा शिकत असल्याने विद्यार्थ्यांची परवड थांबवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक लोकप्रिनिधींच्या दबावाखाली दुरुस्ती काम बंद केलेल्या ठेकेदाराची कानउघडणी करत काम न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की खादरवाडी ग्रामस्थांनी दुरुस्तीसाठी सुरू झालेले मराठी शाळेचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडे दोन महिन्यांपासून तगादा लावला मात्र स्थानिक लोकप्रतनिधींच्या कार्यालयातून काम बंद करण्यास सांगितले असल्याने काम बंद केल्याचे उत्तर दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कोंडूस्कर यांच्या निदर्शनास आली असता तात्काळ त्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट ची कानउघडणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले.
याशिवाय शाळेतील विद्युत पुरवठा गेल्या 3 महिन्यापासून बंद तो सुरू करवून घेतला हेस्काम कडून अधिकाऱ्यांना शाळेला 4 पंखे देण्याची विनंती केली त्यानंतर शाळेत पंखे बसवण्यात आले. आगामी काळात त्वरित काम न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील शाळेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
सगळीकडे शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असताना राजकारण करण्यासाठी शाळेचे दुरुस्ती काम थांबवले जाते याहून दुसरे दुर्दैव काय असेल अशी भावना शिक्षण प्रेमी व्यक्त करत आहेत.
लहान मुलं ही देवा घरची फुले असे सर्वत्र म्हटले जाते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शासकीय यंत्रणा खेळते याला काय म्हणावे एकीकडे चंद्रायान गोष्टी करायच्या अन् दुसरीकडे शाळकरी मुलांना महिने झाडाखाली बसून शिकावे लागते यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत अश्यावेळी मराठी शाळेसाठी पालक म्हणून धाऊन आलेल्या कोंडूस्कर यांना ग्रामस्थ दुवा देत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी जमीन वादात चर्चेत आलेले खादरवाडी मराठी शाळेच्या मुद्द्यावरून देखील चर्चेत आले आहे.