बेळगाव लाईव्ह: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तानाजी गल्ली रेल्वे फाटका शेजारील पडक्या विहिरीत सापडलेला त्या मृतदेहाची ओळख पटली असून तो खून असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
सोमवारी दुपारी तानाजी गल्लीतील पडक्या विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती सुरुवातीला सदर खून की आत्महत्या याबाबत स्पष्टता झाली नव्हती मात्र मार्केट पोलिसांनी तपास करत खून झालेल्या इसमाची ओळख पटवली असून त्याचा खूनच झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हणमंत मादियाळ वय 37 रा. खरोशी तालुका चिकोडी बेळगाव असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
खून झालेल्याच्या नातेवाईकानी मार्केट पोलिसात फिर्याद दाखल केली असून 31 डिसेंबर रात्री हा खून झाला आहे.
हणमंत हा युवक बेळगाव शहरात खाली बाटल्या संकलन करून विक्रीचे काम करत होता 31 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या पार्टी नंतर त्याचे भांडण झाले असावे त्यातून त्याचा खून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मार्केट पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस नेमके खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत.