बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान पाच हमी योजना जाहीर केल्या आणि सत्तेत आल्यानंतर त्या योजना जारी देखील करण्यात आल्या.
या योजना सुरु झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा-उपचर्चांना ऊत आला असून यासंदर्भात काँग्रेसचेच आमदार एच. सी. बालकृष्ण यांनी वादग्रस्त विधान केले.
लोकसभा निवडणुकीत पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकू शकला नाही तर हमी योजना थांबवण्यात येतील, असे विधान त्यांनी केले. या विधानावर आज बेंगळुरू येथे डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस सरकारने ज्या हमी योजना राज्यात लागू केल्या आहेत, त्या योजना ५ वर्षांपर्यंत कायम राहतील. या योजना रद्द केल्या जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपानेदेखील हमी योजनांसंदर्भात टीका केली असून लोकसभा निवडणुकीनंतर या योजना रद्द होतील, असे म्हटले आहे. परंतु राज्यात पुढील ५ वर्षे या योजना कायम राहतील असा दावा डीकेशींनी केला आहे.