बेळगाव लाईव्ह :समाजकार्याचा वसा घेतलेल्या, नेहमी हसतमुख राहणाऱ्या एका व्यक्तीच्या एकसष्ठी सोहळ्याची सद्या सीमाभागात चर्चा आहे. या सोहळ्यात भोजन कसे होते, कोण कोण आले होते, याची चर्चा होणे साहजिकच…. पण चर्चा आहे ती सीमावासियांना मामा करण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झालाय याची…. तरुण आणि जाणकार या कार्यक्रमानंतर प्रश्न विचारू लागले आहेत, संपूर्ण सीमाभाग भाजपच्या दावणीला बांधणार काय?
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एका हसतमुख व्यक्तीच्या एकसष्ठी समारंभाने असा प्रश्न कसा काय उपस्थित केला? आम्हालाही तो पडला. म्हणून बेळगाव लाईव्ह ने याबद्दल तपास केला आणि हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला ते समितीचे खरे निष्ठावंत आहेत आणि ज्यांना पडला नाही ते सगळे मामा होणार आहेत….अशी अनुभूती यातून मिळाली.
या कार्यक्रमात नेमके काय झाले याचा आढावा बेळगाव live ने घेतला असता विचित्र माहिती मिळाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुका पंतप्रधान नरेंद्र मोदी दुरुस्त करत आहेत. त्यामुळे आता सीमाप्रश्न सुटणार आहे, असे या कार्यक्रमात सांगण्यात आले. हसतमुख व्यक्तीच्या सत्कार समारंभात त्याचे कौतुक करतानाच भाजपच्या नेत्याचे, अर्थात देशाच्या पंतप्रधानाचे कौतुक करण्याचा काहीच उद्देश नव्हता. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी भाजपची एजंटगिरी सुरू झाल्याची प्रचिती या कार्यक्रमातून आली.
मागील पोट निवडणूकित भाजपच्या उमेदवाराला पुष्प गुच्छ दिल्याने अडचणीत आलेल्यांना युवा कार्यकर्त्यांचा रोष पाहून काही दिवस गाव सोडावे लागले होते आणि तेच मॉर्निंग वॉकर्स याही कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांच्या वरच पुन्हा एकदा टीका होत आहे. ‘आमचे नेते’ म्हणून भाषणात उल्लेख झालेल्या एका मध्यवर्तीच्या नेत्याचा मात्र यावेळी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी मरगळलेल्या मनानी आपली मान खाली घातली होती.
या कार्यक्रमातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या एका इच्छुकाचे प्रदर्शन आणि समर्थन ही झाले. त्याचा सत्कार झाला. दरम्यान भाजपच्या उमेदवाराला फोकस करण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून संबंधितांनी स्वतःच्या एकसष्ठी समारंभाचे मॉडेल पुढे केले की काय? असा प्रश्न उपस्थितांना पडला. मात्र यावेळी सीमा भाग 2007 च्या सारखा गाफील नक्कीच नसून माझ्या संस्था वाचवा… मी सीमा भागातील मते देतो… असे सांगून जनतेला ‘मामा’ करणाऱ्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल…. अशी आशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
बेळगावात मराठीचा रक्षणकर्ता म्हणून कुणाला बघता?
https://pollie.app/h832t
Click a link to vote:
महाराष्ट्र एकीकरण समिती
👉 https://pollie.app/6rp1n
काँग्रेस
👉 https://pollie.app/f70lu
भाजप
👉 https://pollie.app/2t0do
स्वतः मराठी माणूस
👉 https://pollie.app/nfb2g


