बेळगाव लाईव्ह :बेळगावात नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या तानाजी गिल्ली कॉर्नर रेल्वे फाटका जवळील शेजारील विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तानाजी गल्ली ब्रह्मदेव मंदिरा जवळील विहिरीत मृतदेहाचे पाय तरंगत असल्याचे दिसल्याने खळबळ माजली आहे.
तरंगत असलेला मृतदेह नेमका खून आहे की आत्महत्या याबाबत साशंकता असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरू आहे.
त्या विहिरी शेजारी रक्त पडलेले असून रात्री नवीन वर्षाच्या स्वागता नंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकला आहे की काय?मृतदेह कुणाचा आहे त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असून याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक देखील दाखल झाले आहे.
तानाजी गेली कॉर्नरवर सोमवारी दुपारी ही घटना उघडली आल्याने बघ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे.