बेळगाव लाईव्ह : उपमुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मंत्र्याने माध्यमातून जाहीर वक्तव्य देऊ नये अश्या सूचना एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे तेलंगणा आणि कर्नाटकच्या काँग्रेस च्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या तीन महिन्यापासून कर्नाटक काँग्रेसमधील अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पदासंदर्भात जाहीर वक्तव्य केली आहेत त्यामुळे विनाकारण गोंधळ निर्माण होत आहे राज्य सरकारआणि पक्षाच्या वर्चस्वाला नुकसान झाले आहे यासाठी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणतेही वक्तव्य करू नये अशा सूचना खर्गे यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
अशा सूक्ष्म गोष्टींबाबत मंत्र्यांनी एकमेकांशी चर्चा करावी आणि माध्यमातून बोलणे टाळावे याबाबत काँग्रेस हाय कमांडने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मात्र याच विषयावर वक्तव्य करून गोंधळाचे वातावरण निर्माण करू नये असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारतील प्रत्येक मंत्र्याला महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे दिलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडण्याची अनावश्यक वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशा गोष्टी चा फायदा कोणता होणार आहे असा प्रश्न उपस्थित करत कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.