Thursday, December 26, 2024

/

सुसाट बुलेटची दुभाजकाला धडक; युवक जागीच ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव बुलेट मोटरसायकलने दुभाजकाला धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काल मध्यरात्री शहरातील कॉलेज रोडवर घडली.

अपघातात ठार झालेल्या अंदाजे 24 वर्षीय युवकाचे नाव पंकज आणि तो मच्छे येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताची थोडक्यात माहिती अशी की, काल मध्यरात्री नववर्षाचे स्वागत झाल्यानंतर मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास दोन युवक बुलेट मोटरसायकल वरून भरधाव वेगाने राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून कॉलेज रोड वरून धर्मवीर संभाजी चौकाच्या दिशेने निघाले होते.

त्यावेळी सरदार मैदानाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट मोटरसायकल दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक तितकी जोराची होती की अपघाताचा प्रचंड मोठा आवाज झाला. अपघातात डोक्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात पंकज सोबत असलेल्या त्याच्या मित्राला मात्र किरकोळ दुखापत होण्यापलीकडे सुदैवाने काहीही झाले नाही.

अपघाताच्या आवाजाने घटनास्थळी धावलेल्या नागरिकांपैकी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ 112 रुग्णवाहिका मागवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजसह त्याच्या जखमी मित्राला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली.

दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कुमार हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. सदर अपघाताची रहदारी दक्षिण विभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.