बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरातील थंडीमध्ये कमालीची वाढ झाली असून काल 10.6 अंश इतके असलेले शहराचे तापमान आज बुधवारी आणखी घसरून चक्क 9 अंश सेल्सिअस इतके झाले आहे.
आजचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. यामुळे दुपार होत आली तरी हवेतील गारठा कायम असल्याचे जाणवत आहे.
गेल्या कांही दिवसांपासून शहराचे तापमान झपाट्याने घसरत असून आजचे 9 अंश सेल्सिअस हे तापमान आठवड्याभरात नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान आहे.
या निच्चांकी तापमानामुळे वातावरणातील गारठा अधिकच जाणवत आहे.