Monday, January 6, 2025

/

महापौर, मनपा आयुक्त ‘याची’ अंमलबजावणी करतील का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेले व्यापारी दुकानदार वगैरे लोकांमध्ये अग्निशमन उपकरणांच्या महत्त्वासंदर्भात जनजागृती जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गर्दी होणाऱ्या भागात ठराविक ठिकाणी अग्निशमन उपकरणे सज्ज ठेवली जावीत, अशी विनंती फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी महापौर आणि बेळगाव महापालिका आयुक्त यांना एका पत्राद्वारे केली आहे.

आम्ही केलेल्या सर्वेक्षणात शहरातील होलसेल व रिटेल दुकानं, इलेक्ट्रॉनिक दुकान, कपड्यांचे दुकान त्याचप्रमाणे हॉटेल्सचे स्वयंपाकगृह (किचन) या ठिकाणी जर आगीची दुर्घटना घडली तर कोणतेही योग्य अग्निसुरक्षा उपकरण किंवा वॉटर स्प्रिंकलर्स नाहीत.

धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसर, बापट गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ, पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, खडेबाजार बेळगाव, खडेबाजार शहापूर वगैरे कायम गर्दी असणाऱ्या बाजारपेठेच्या ठिकाणी शासनाने अग्निशमन उपकरणांच्या महत्त्वासंदर्भात जनजागृती केली पाहिजे. कारण अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन मदत पथकाला आपल्या पाण्याच्या टँकरसह गर्दीच्या आणि अरुंद रस्त्यावरून घटनास्थळी पोहोचणे कठीण जाते.

त्यामुळे माझा सल्ला आहे की, बाजारपेठेतील एखादी योग्य जागा निवडून त्या ठिकाणी अग्निशमन उपकरणे (फोटोत दाखविल्याप्रमाणे) सज्ज ठेवावीत. जेणेकरून आणीबाणीच्या काळात लोकांना किंवा दुकानदारांना मदत पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्या उपकरणांचा चांगला उपयोग करता येईल.

ज्यामुळे एखाद्याचे प्राण वेळेवर वाचवता येऊ शकतील. तरी यापूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनांचा गांभीर्याने विचार करून उपरोक्त क्रम घेतले जावेत, अशा आशयाचा तपशील संतोष दरेकर यांनी आज महापौर आणि महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. काल शहरातील बसवन गल्ली येथे गॅस गळतीमुळे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त पत्र लिहिण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.