बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता हुतात्मा चौक बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करण्यात येणार आहे .
या अभिवादन कार्यक्रमास बेळगाव मधील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .
हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर , महादेव गडी , लक्ष्मण गावडे, कमलाबाई मोहिते यांनी 17 जानेवारी 1956 या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
8 फेब्रुवारी 1969 रोजी 67 हुतात्मे शिवसेनेने दिले . 01 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले . या साऱ्यांना आदरांजली वाहून प्रतिज्ञाबद्ध होण्याचा हा दिवस 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा मंदिर येथे बेळगाव येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या गेल्या 40 वर्षातील सीमा प्रश्नावर काही व्यंगचित्रांचे प्रदर्शन मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित केले आहे 17 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या काळात हे प्रदर्शन सर्वांना पाहता येईल