बेळगाव लाईव्ह :बेळगांव सिव्हील हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलचे नूतन वैद्यकीय अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतल्याबद्दल डॉ. ईरांन्ना पल्लेद यांचा आज बेळगावचे माजी महापौर व समाजसेवक विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व समाज सेवकांतर्फे खास सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकांनी आज मंगळवारी सकाळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरांन्ना पल्लेद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विजय मोरे यांच्यासह माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, श्रीधर पाटील, समाजसेवक प्रा. निलेश शिंदे, बेळगांव बीम्सचे मुख्य व्यवस्थाक एल. एस. पंगणावर, प्रभारी मुख्य व्यवस्थाक भीमाण्णा कोणी, संतोष ममदापूर, प्रकाश परांडेकर, उमेश पाटील यांच्यासह बेळगावातील येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
माजी महापौर विजय मोरे यांनी यावेळी बोलताना बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच या हॉस्पिटल मधील कमतरता दूर करून जनतेच्या हितासाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य करण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे, असे मत व्यक्त केले. समाजसेवक प्रा. निलेश शिंदे यांनीही समायोचित विचार व्यक्त केले.
नूतन पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरांन्ना पल्लेद सत्काराला उत्तर देताना गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी सेवा करत आहे. त्यामुळे येथील महत्त्वाचे घटक माझ्या परिचयाचे आहेत यापुढेही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी कार्य करेन.
तसेच हॉस्पिटल मधील कांही अडचणी आहेत त्या जाणून घेऊन समस्या दूर करण्यासाठी मी सदोदित प्रयत्न करेन असे असे सांगून हॉस्पिटलमध्ये कल्याणकारी वैद्यकीय योजना राबविण्याचा माझा सदोदित प्रयत्न राहील असे डॉ. पल्लेद यांनी स्पष्ट केले.